येथील महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन भडगाव शाखा, प्रयाग पाईप्स व न्यु पांडुरंग हार्डवेअर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक प्लंबिंग दिनानिमीत्त लक्ष्मणभाऊ मंगलकार्यालय येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यशाळेचे उद्घाग्टन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करन्यात आले. तसेच उपस्थित ईंजिनीयर, आर्कीटेक्ट, सर्व प्लंबिंग व्यावसायिकांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करन्यात आला.
दिनेश मिस्तरी यांनी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएनची माहीती व कार्यप्रणाली प्रस्ताविकाद्वारे मांडली. तसेच आलेल्या मान्यवरांनी बिल्डींग बांधकाम मधील प्लंबरचे अस्तीत्व व महत्व सांगुन आपापले मनोगत व्यक्त केले. प्रयाग कंपनीचे सेल्स एक्झीकेटीव माळी साहेब यांनी कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल सविस्तर माहीती सांगीतली. न्यु पांडुरंग हार्डवेअरचे संचालक विवेक शिरसाठ यांनी त्यांच्या दुकानातील वस्तुंबद्दल माहीती सांगीतली. या कार्यशाळेत तालुक्यातील सर्व प्लम्बर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment