(भडगाव प्रतिनिधी) भडगाव शहरास एक प्राचीन व ऐतिहासिक परंपरा असून गेल्या साडेतीनशे वर्षांपासून शहरात श्रीराम रथोत्सव साजरा करण्यात येतो. सालाबाद प्रमाणे या वर्षीही श्रीराम नवमी निमित्त दि.1 एप्रिल कामदा एकादशी ला भडगाव येथे भव्य रथ उत्सव साजरा होणार आहे. यासाठी भडगाव तहसील कार्यालयात रथ उत्सव समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला ले तहसिलदार- मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक- राजेंद्र पाटिल, मुख्याधिकारी - रवींद्र लांडे, पो. हे. कॉ विलास पाटील, स्वप्नील चव्हाण, विद्युत मंडळाचे दहीवळे, रथ उत्सव समिती अध्यक्ष युवराज तहसीलदार सह रथ उत्सव समिती सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी रथ उत्सव समितीची माहिती व त्या दिवशी होणाऱ्या समस्या या जाणून घेत समस्यांचे निवारण त्वरित करण्याचे आदेश संबधित विभागाला दिले, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी रथ उत्सव हा शांततेत पार पाडावा यासाठी सूचना केल्या. मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी रथ मार्गावर रस्त्यावर असलेले खड्डे हे त्वरित बुजवण्यात येतील व मार्गावर होणारे अडथळे त्वरित दूर करण्यात येतील असे यावेळी सांगीतले. तसेच रथ उत्सव समितीचे सर्व सदस्यांनी सांगितलेल्या सर्व प्रस्नांचे त्वरित मार्ग काढण्यात येईल असे तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी यावेळ सांगीतले व बैठकीचा समारोप करण्यात आला.
Post a Comment