धरणगाव : अवैध वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी व डंपरवर कारवाई न करण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे.याबाबत अधिक असे की अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई न करण्यासाठी ३० हजाराची लाचेची मागणी करण्यात आली होती.तसेच तडजोडीअंती २५ हजाराची लाच स्वीकारताना धरणगाव येथील नायब तहसिलदार जयंत पुंडलिक भट व कोतवाल राहुल नवल शिरोडे याचावर जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे.यामुळे धरणगाव तहसिल कार्यालयात एकच चर्चा निर्माण झाली आहे.जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे
Post a Comment