धरणगाव येथील तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी तहसिलदार तथा निवासी नायब तहसिलदार मा. लक्ष्मण सातपुते होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मा.दिनेश तायडे, व विनायक महाजन तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत श्री.सतीश असर सचिव ग्राहक पंचायत,तसेच धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष.जी.डी.पाटील,उपाध्यक्ष. प्रभाकर अण्णा पाटील तसेच शहरातील सुजाण नागरिक व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.दिनेश तायडे यांनी सर्व उपस्थितांना जागतिक ग्राहक दिनाबाबतची पार्श्वभूमी कथन करुन ग्राहकांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले.ग्राहक हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा राजा असून त्याचेवर संपूर्ण अर्थचक्र हे गतिमान आहे. ग्राहकाचे हक्क व त्यांचे संरक्षण होणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.त्याचप्रमाणे श्री विनायक महाजन यांनी देखील मार्गदर्शन केले व श्री. लक्ष्मण सातपुते साहेब प्रभारी तहसिलदार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात ग्राहकाची फसवणूक न होण्यासाठी त्यांनी घ्यावयाची खबरदारीबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.राजेंद्र ओस्तवाल यांनी केले
Post a Comment