(पाचोरा:प्रतिनिधी) पाचोरा : येणाऱ्या राम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद या सण - उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दि. २५ मार्च २०२३ रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तालुक्यातील पोलिस पाटील बंधु भगिनींची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी उपस्थित पोलिस पाटील बंधु भगिनींना सण - उत्सवात घ्यावयाची काळजी तसेच आप आपल्या गावात शांतता कशी राखावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. उपस्थित पोलिस पाटील यांनी त्यांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे मत मांडले असता पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी उपस्थित पोलिस पाटील बंधु भगिनींना योग्य मार्गदर्शन केले. या बैठकीस तालुक्यातील पोलिस पाटील बंधु भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकी प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, गोपनीय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, नितीन सुर्यवंशी, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, गजु काळे, विनोद बेलदार, भगवान बडगुजर, विनोद शिंदे, विश्वास देशमुख, विकास खैरे, सचिन पवार हे उपस्थित होते.
Post a Comment