गुढीपाडवा निमित्त बुधवारी नववर्ष स्वागत मिरवणूकीचे आयोजन

 



श्री बालाजी व्यवस्थापक मंडळाकडून मिरवणूकीत सहभागी होण्याचे आवाहन 


(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ धरणगाव, हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त २२ मार्च, बुधवार रोजी सकाळी ७.०० वाजता भव्य गुढीपाडवा मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी गावातील सर्व सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळ, लेझीम मंडळ, महिला मंडळ, कीर्तनकार, भजनी मंडळ तसेच सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नववर्ष स्वागत मिरवणूकीचा प्रारंभ श्री बालाजी मंदिर येथून धरणी चौक, बाजारपेठ, श्रीराम मंदिर परिहार चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, अर्बन बँक, अहिल्याबाई होळकर चौक, नेताजी रोड, मातोश्री कॉम्प्लेक्स, धरणी पूल, वाणी गल्ली मार्गे बालाजी मंदिर परिसरात आरती तद्नंतर प्रसाद वाटप करून समारोप होणार आहे. अशी माहिती श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी आर पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्याध्यक्ष जीवनसिंह बयस, सेक्रेटरी प्रशांत वाणी, सहसेक्रेटरी अशोक येवले, खजिनदार किरण वाणी आदी संचालकांनी माहिती दिली आहे. सदर मिरवणुकीत शहर व परिसरातील बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments