ऑल इंडिया पँथर सेनेची जिल्हा प्रशासनाला मागणी
(धुळे प्रतिनिधी) धुळे : काही संघटनेच्या वतीने छ. संभाजीनगर शहराच्या नामांतराच्या समर्थनार्थ क्रांती चौक छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यात आंबेडकरी समाजाचे प्रतिक व अस्मिता असणारे निळे ध्वज जमीनीवर फेकून अवमान करण्यात आलेला आहे. तसा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना ही दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे निघालेल्या मोर्चेत निळ्या ध्वजाचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी. अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा ऑल इंडिया पॅंथर सेनेने निषेधही नोंदवला आहे....
हे कृत्य आयोजकांकडून जाणुनबुजून केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. यामुळे या मोर्चाच्या आयोजकांवर व ज्यांनी जाणुनबुजून आमच्या अस्मितेला टार्गेट करुन व निळा ध्वजाचा अवमान केला आहे अशा समाजकंटकांचा शोध घेऊन पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे...
निवेदन देतेवेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते , त्याचबरोबर आनंद अमृतसागर ,भाऊसाहेब बळसाणे,अशोक करंजे,निलेश इंदवे, आधी यावेळी उपस्थित होते.
Post a Comment