राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याने धुळ्यात काँग्रेसचा रास्ता रोको

 



(धुळे प्रतिनिधी) धुळे : जुन्या वक्तव्या प्रकरणी सुरत येथील न्यायालयाने खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यांची खासदारकी रद्द केल्याने धुळ्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे.

 लोकशाहीचा खून करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, मोदी हटाव देश बचाव, चौकीदार चोर है, आदी घोषणा देत केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले आहे.  

 शहरातील काँग्रेस भवन जवळ काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय लोकशाहीचा घोट घेणारा असून भारताच्या राजकारणातला हा काळा दिवस आहे. तसेच संसदेचे सदस्यत्व रद्द करणे हे बेकायदेशीर असून मोदी सरकारने सत्तेच्या जोरावर हा निर्णय घेतला असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर केला आहे. या

प्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम सनेर, शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, अशोक सुडके, डॉ. दरबार सिंग गिरासे, बापू खैरनार, गणेश गर्दे, गायत्री जयस्वाल यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments