जिल्ह्यातून १५ हजार शिवसैनिक रवाना; शिवसेना सहसंपर्क प्रमुख; गुलाबराव वाघ
(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथील कॉलेज ग्राउंड येथे जाहीर सभा आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. जळगाव जिल्ह्यासह, राज्याच्या कानाकोप-यातून शिवसैनिक सकाळीच मालेगावच्या दिशेनं रवाना झाले आहेत. आजच्या सभेत उद्धव ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधतात याकडे संपूर्ण राज्यातील शिवसैनिकांना कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान धरणगाव व परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करुन लक्झरी व बसेसमधून निष्ठावंत शिवसैनिकांसमवेत शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी या सभेसाठी रवाना झालेत. यावेळी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, कौण चले भाई कौण चले, शिवसेना के वीर चले, ही ताकद कोणाची शिवसेनेची, उध्दव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिक मोठ्या संख्येने मालेगाव येथील सभेसाठी रवाना झालेत.
सभेला रवाना होण्यापूर्वी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगीतले की, उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी जळगांव जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक हे मालेगावच्या दिशेने रवाना होत आहे. जिल्ह्यातून १०० पेक्षा जास्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल दहा ते पंधरा हजार शिवसैनिक हे मालेगावला रवाना झालेले असून सद्यस्थितीत देखील रवाना होत आहे. जवळपास दीड लाख कार्यकर्ते जमणार असल्याचे सहसंपर्कप्रमुख श्री.वाघ यांनी सांगितले.
Post a Comment