कामगारांनी नेहमी एकजुटीने काम करा,मी नेहमी कामगारांचे पाठीशी उभा राहिल ; गटनेते अनिल वानखेडे




शिंदखेडा: जळगाव सोसायटीच्या एस.टी.महामंडळ पंचावार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत कष्टकरी जनसंघ संघटनेचे परिवर्तन पॅनल चा विजय झाला असून पॅनलने इतिहास घडवला आणि गेली अनेक दशकाच्या सत्तेला सुरुंग लावून बहुमताने निवडून आलेत १७ पैकी १७ संचालकांचा विजय झाला यात शिंदखेडा आगारातील नवनिर्वाचित संचालक समाधान पाटील यांचा सत्कार शिंदखेडा शहराचे विकास पुरुष भाजपाचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे यांनी केला या प्रसंगी उपनगराध्यक्ष भिला पाटील ,माजी नगरसेवक उदय देसले, माजी नगरसेवक उल्हास देशमुख,स्वप्निल मोरे(मनसे), माजी नगरसेवक विनोद पाटील उपस्थित होते.शिंदखेडा आगारातील कष्टकरी जनसंघ संघटनेच्या वतीने जेष्ठ कामगार नेते , एसटी सेवानिवृत्त संघटनेचे सचिव बी.एल.सोनवणे यांनी भाजपचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे यांचा सत्कार केला याप्रसंगी शिंदखेडा आगारातील कष्टकरी जनसंघ संघटनेचे पदाधिकारी विनोद पाटील ,अरुण पाटील,भदाणे साहेब,महाले साहेब,बेहेरे साहेब,दिनेशजी चाळशे आणि आगारातील सर्व सन्माननीय सभासदांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी भाजपाचे गटनेते अनिल वानखेडे यांनी अनमोल मार्गदर्शन केले, आपला विजय हा एकजुटीचा विजय असून कामगारांनी नेहमी एकजुटीने राहूनच काम करण्याची गरज असल्याचे सांगून मी नेहमी कामगारांच्या पाठीशी उभा राहिल असे अभिवचन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणजी पाटील यांनी केले.बी.एल.सोनवणे आप्पा यांनी आभार व्यक्त करून कष्टकरी जनसंघ संघटनेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या सभासदांना एकजुटीने राहून काम करण्याचे परिणाम सांगितले.

0/Post a Comment/Comments