जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपला धरणगावात उस्फूर्त प्रतिसाद

 


एकच मिशन - जुनी पेन्शन : नाना पाटील [ जिल्हा सरचिटणीस -जुनी पेन्शन हक्क संघटन, जळगाव जिल्हा ]


जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची काठी आहे - पंजाबराव पाटील


धरणगांव - महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी महाराष्ट्रभर १४ मार्च, २०२३ पासुन बेमुदत संप पुकारला असून या संपात धरणगाव शहर व तालुक्यातील सर्व राज्य शासकीय कर्मचारी, प्राथमिक - माध्यमिक शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद सहभागी होते.

धरणगाव तहसील कार्यालयासमोर एकच मिशन - जुनी पेन्शन चा नारा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने लावण्यात आला. याप्रसंगी धरणगावचे तहसीलदारसो लक्ष्मण सातपुते, गटविकास अधिकारी सुशांतआप्पा पाटील, धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांना शासकीय - निमशासकीय कर्मचारी, शिक्षक बंधू - भगिनीं व कर्मचारी वृंदांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

जुनी पेन्शन ही सर्व शासकीय - निमशासकीय कर्मचाऱ्यांची म्हातारपणाची काठी आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संप सुरू केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस साहेब यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत या महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संपावर आहोत.

या संपात धरणगाव शहर व ग्रामीण भागातील सर्व  प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, सर्व ग्रामसेवक, शासकीय निमशासकीय कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments