धुळ्यात श्रीराम नवमी निमित्त अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात उसळला भगवा जनसागर


(धुळे : प्रतिनिधी) धुळे : धुळ्यात श्रीराम नवमी निमित्त न भूतो न भविष्यती भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात भगवा जनसागर उसळल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील संतोषी माता चौकातून प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत शहरातील हजारो बांधव व भगिनी सहभागी झाले होते. प्रभू सियावर रामचंद्र की जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम आधी घोषणांनी परिसर चांगलाच दुमदुमून गेला होता. प्रभू श्रीरामांच्या नृत्यावर अनेक तरुणांनी ठेका देखील धरला होता.

शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण शहरात भगवामय वातावरण निर्माण झाले होते. आकर्षक अशा रथामध्ये सजवण्यात आलेल्या श्रीराम, लक्ष्मण , माता सीता व हनुमान यांच्या मुर्त्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. संतोषी माता चौकातून निघालेली ही रॅली पुढे फाशी फुल, मील परिसर, स्टेशन रोड, आग्रा रोड, पारोळा रोड, देवपूर, वाडी भोकर रोड मार्गे साक्री रोड कडून काढण्यात आली. पुढे रॅलीचा समारोप आग्रा रोडवरील श्रीराम मंदिराजवळ झाला. 


महिलांचा लक्षणीय सहभाग - या रॅलीमध्ये शहरातील विविध भागातील महिला फेटे घालुन , भगवा ध्वज हाती घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रभू श्रीरामांच्या घोषणाबाजी करत महिला देखील मार्गस्थ झाल्या.  याप्रसंगी खासदार डॉ.सुभाष भामरे, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल , स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, माजी महापौर चंद्रकांत सोनार , प्रदीप करपे , नगरसेवक शितल नवले , देवेंद्र सोनार, माजी नगरसेवक भिकन वराडे, राकेश कुलेवार यांच्यासह पदाधिकारी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments