सरदार व.प. कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे वनस्पतीशास्त्र विभाग व तालुका कृषी अधिकारी विभाग, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्ताने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पदार्थ विज्ञान विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ.के.जी.कोल्हे यांनी भूषविले. .सदर कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र , पालचे वरीष्ठ शास्त्रज्ञ . महेश महाजन व रावेर येथील तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी
सचिन गायकवाड यांनी. "तृणधांन्यांचे आहारातील महत्त्व'' या विषयावर प्रमुख वक्ते महणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. आजच्या धावपळीच्या युगात खाद्यसंस्कृतीत बदल करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महेश महाजन यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी सतर्क राहून तृणधान्यांचे महत्व या विषयी समाजात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे असे मत श्री सचिन गायकवाड यांनी व्यक्त केले.याप्रसंगी रावेर येथील मंडल कृषी अधिकारी मा. श्री साठे साहेब उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त " तृणधांन्यांचे आहारातील महत्व " या विषयावर निबंध आणि वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक- अलताब युसुफ पटेल ( तृतीय वर्ष विज्ञान) , द्वितीय क्रमांक - ललित कडू पाटील ( तृतीय वर्ष विज्ञान) याने तर तृतीय क्रमांक- दीपाशा सखाराम गुरव हिने पटकावला. उत्तेजनार्थ क्रमांक इशीता सुभाष महाजन ( प्रथम वर्ष विज्ञान) व रोहिणी प्रल्हाद तेली ( तृतीय वर्ष कला ) या विद्यार्थिनींनी पटकावला. तसेच वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक - साक्षी डिगंबर लवंगे (द्वितीय वर्ष विज्ञान), द्वितीय क्रमांक - जयश्री योगेश महाजन ( द्वितीय वर्ष विज्ञान) यांनी तर तृतीय क्रमांक - दिपाशा सखाराम गुरव ( प्रथम वर्ष विज्ञान) हिने पटकावला. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तर सहभागी स्पर्धकांना ही प्रमाणपत्र देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यशाळेचे समन्वयक डॉ एस. ए. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. स्पर्धेसाठी मा . प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी डॉ. एस. एन.वैष्णव यांच्या समवेत शिक्षकेतर कर्मचारी सुनील पाटील, नितीन महाजन, हर्षल पाटील , जयेश बढे व श्रेयस पाटील यांचे सहकार्य लाभले.
Post a Comment