मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी ,शिंदखेडा येथे काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम



(शिंदखेडा प्रतिनिधी) शिंदखेडा - येथे मा. प्रांताध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आज शिंदखेडा शहरांमध्ये धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली सह्यांच्या मोहिमेला सुरुवात झाली.देश लुटणा-या निरव मोदी ललित मोदींना  चोर म्हटले, अदानी महाघोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली म्हणून खोट्या तक्रारी दाखल करून राहुलजी गांधी यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणा-या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज शनिवार दि. २५ मार्च रोजी  शिंदखेडा येथे वरपाडे चौफुली चौकामध्ये राहुलजींच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन करून सह्यांची मोहीम राबविण्यात आली.यावेळी शिंदखेडा नगरपंचायतचे विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी नगरसेवक दीपक अहिरे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब पवार तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरेंद्र झालसे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र देवरे महेंद्र देसले खंडू भदाने बलराज थोरात समाज शेख दीपक भदाणे दिनेश माळी अशोक बोरसे किरण थोरात गोपाल दिग्रळे पंजाब पवार हिम्मत पाटील श्याम बोरसे महेंद्र बदाणे नरेंद्र पाटील मुन्ना बोरसे उमेश वाडीले उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments