रस्ता लूट करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना एल सी बी ने ठोकल्या बेड्या




(धुळे प्रतिनिधी ) धुळे - रस्त्यावरील वाहने अडवून लूट करणाऱ्या मालेगाव च्या दोघा सराईत गुन्हेगारांना एलसीबी ने बेड्या ठोकल्या असून दोन मोटरसायकल व एक मोबाईल असा 72 हजार रुपयांचा मुद्देमाल एलसीबीनी जप्त केला आहे. या दोघं सराईत गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.  

 1)भगवान सिताराम करगळ वय 30 रा. मालेगाव 2) विठोबा रामचंद्र बाचकर वय 40. रा. मालेगाव असे अटक केलेल्या आरोपींची नाव असून मगन बाळू पाटील सेवानिवृत्त शिक्षक रा. देवपूर हे मालेगाव हून धुळ्याकडे येत असताना  पुरमेपाडा शिवारात त्यांची मोटरसायकल अडवून या दोघा चोरट्याने लूट केली होती. या लुट संदर्भात तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता . या दाखल कुणाचा तपास करत असताना एलसीबीने या दोघा चोरट्यांच्या मुस्क्या मालेगावातून आवळल्या आहे. 

      

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने केली आहे.

0/Post a Comment/Comments