मेंढपाळ बांधवांवर नैसर्गिक आपत्ती, धरणगावात ७६ हून अधिक मेंढ्या दगावल्या, तर १४८ मेंढी अत्यावस्थेत

 



(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव: शहरातील मोठा माळी वाडा ते पिंपळे रस्त्यावरील शेतात काही मेंढपाळ थांबलेले होते. याच ठिकाणी रात्रीतून विषबाधा झाल्याने तब्बल ७६ हून अधिक मेंढ्या दगावल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील मोठा माळी वाडा ते पिंपळे रस्त्यालगत दिलीप मधुकर वाघ (माळी) यांच्या शेतात धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ गोरख ठेलारी यांचा वाडा उतरला होता. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे, शेतातील काढलेला गव्हाच्या उंबीला ढीर कोंब आलेले बुरशी लागलेले गहू अतिप्रमाणात खाल्ल्यानं जवळपास ७६ हून अधिक मेंढ्या दगावल्या आहेत. तर, १५० हून अधिक मेंढ्या अत्यावस्थेत आहेत. मेंढ्या दगावल्यानं जवळपास १५ लाखांचे नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक कैलास माळी यांनी पशूवैद्यकीय अधिकारी यांना याबाबतची खबर दिली. पशूवैद्यकीय डॉ. महाजन यांनी मेंढ्यांचं शवविच्छेदन केलं. याठिकाणी ठाकरे गटाचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख ॲड.शरद माळी, शहरप्रमुख भागवत चौधरी, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, पिंपळे ग्रामपंचायतचे समाधान पाटील, किरण पाटील यांच्यासह जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, बाळू जाधव, रवी महाजन, राजु महाजन, आदी उपस्थित होते. यावेळी कृषी अधिकारी श्री. देसले, निवासी नायब तहसीलदार श्री. सातपुते, जिल्हा परिषदचे डॉक्टर महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, पिंपळे गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, धरणगाव शहरातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी बाळू जाधव, रवी महाजन, राजू सुकलाल महाजन, हेमंतभाऊ चौधरी उपस्थित होते. दरम्यान, ७६ च्यावर मेंढ्या दगावल्याने मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले आहे.

0/Post a Comment/Comments