वृक्षारोपणाने पर्यावरणाचा समतोल राखला जातो; राजेंद्र वाघ

 

जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत धरणगाव येथील  कृष्ण गीता नगर मध्ये वृक्षारोपण


(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : शहरातील कृष्ण गीता नगर येथे जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. चिमणी दिनाचे औचित्य साधून कृष्ण गीता नगरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पालिकेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र गांगुर्डे, निलेश वाणी, वन्य जीव संरक्षण संस्थेचे सदस्य तथा सर्पमित्र भरत शिरसाठ, राजेंद्र वाघ, विनोद रोकडे, कैलास पवार, लक्ष्मणराव पाटील, महेश चौधरी, बी एम सैंदाणे, विनायक न्हावी उपस्थित होते. नगरातील बंधू-भगिनी व बाल - गोपालांच्या हस्ते मोकळ्या जागेत लिंब, पिंपळ, चींच, वड असे विविध रोपांची लागवड करुन, यासोबत ट्री गार्ड देखील बसविण्यात आले.

 याप्रसंगी वन्य जीव संरक्षण संस्थेचे राजेंद्र वाघ यांनी जागतिक चिमणी दिनाचे महत्त्व विषद करताना म्हणाले की, एकेकाळी सर्रास पाहायला मिळणाऱ्या चिमण्या शहरातून मात्र मोठ्या प्रमाणावर गायब झाल्या आहेत. अन्नसाखळीत एक महत्वाचा दुवा असणारी चिमणी आज झपाट्याने घटत चालली आहे याच्यावर मंथन करण्याचा दिवस म्हणजे २१ मार्च, अर्थात जागतिक चिमणी दिवस. पर्यावरणात चिमणी चिरकाल राहण्यासाठी वृक्षारोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीमुळे पर्यावरण टिकून राहते आणि निसर्गाचा समतोल राखला जातो. याकरिता वृक्षरोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे. असेही श्री.वाघ म्हणाले. यावेळी जे एस पवार, एस एन कोळी, ज्ञानेश्वर पवार, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, संजय सुतार, गोकुळ महाजन, वासुदेव न्हावी, सुधाकर मोरे, महेंद्र सैनीमाळी, संजय मिस्तरी तसेच कॉलनीतील भगिनी व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments