तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट एकरी २५ हजार भरपाई द्यावी; शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांचे प्रतिपादन
धरणगाव : शहरासह संपुर्ण तालुक्यात दि.१५, १६ आणि काल १९ मार्च रविवार रोजी बेमोसमी अवकाळी व वादळी वाऱ्यासह पावसाचे एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा आगमन झाले. यामध्ये गहू, मका, हरभरा, दादर, टरबुज पिकासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धरणगाव शहरासह तालुका परीसरातील सर्वच शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासंदर्भात धरणगाव तहसिलचे प्रभारी तहसिलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत सांगितले की, आधीच शेतकऱ्यानी पिकविलेला मालाला भाव नाही. शेतकरी कापसाचे दुःख सावरत नाही तोवर एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांचा पिकांची झालेली हानी भरून निघावी याकरिता शेतकऱ्यांना सरसकट शासनाने एकरी २५ हजार रुपयाची ठोस मदत द्यावी असे ठाकरे गटाचे नेते श्री. वाघ यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या.
निवेदन सादर प्रसंगी यूवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी, शहरप्रमुख भागवत चौधरी, नगरसेवक जितेंद्र धनगर, भिमराव धनगर, किरण मराठे, राजेंद्र ठाकरे, नाना ठाकरे, विजय पाटील, रणजित शिकरवार, कृपाराम महाजन, संतोष सोनवणे, हेमंत महाजन, परमेश्वर महाजन, महेंद्र महाजन, गजानन महाजन, महेश चौधरी, गोपाल पाटील, विलास पवार, संतोष महाजन, गोपाल आण्णा महाजन, राहुल रोकडे, प्रेमराज चौधरी, किरण अग्निहोत्री, गणेश महाजन, सुरेश महाजन, बापू महाजन, संजय भदाणे, प्रकाश शिंपी, नितीन कापुरे, सागर महाजन, मधुकर पाटील, भरत चौधरी, करीम लाला, संजय चौधरी, वसीम खान, ज्ञानेश्वर माळी, सुनील लोहार यांच्यासह असंख्य शेतकरी, व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.
Post a Comment