पोलीस पाटील युवराज माळी यांचा धुळे जिल्हा माळी समाजातर्फे सन्मान




शिंदखेडा : तालुक्यातील भडणे येथील आदर्श कर्तव्यदक्ष पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांचा, पोलीस पाटील नियुक्ती झाल्यापासून अवघ्या चार वर्षात त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेत आतापर्यंत 30 पुरस्कार मिळाले आहेत. नेहमी गरजूंना केलेली मदत समाजासाठी दिलेला वेळ, गावासाठी केलेले समाजकार्य प्रशासनास केलेली मदत, महसूल व गृह विभागात केलेली उल्लेखनीय कामगिरी तसेच त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार गौरव, तसेच त्यांनी समाजासाठी, राबविलेले समाजभिमुख उपक्रम व कार्याची दखल घेत जिल्ह्यातील माळी समाजाच्या मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्हा माळी समाजातर्फे त्यांचा ,भडणे, येथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ,देऊन सन्मान करण्यात आला व कौतुकाची थाप मिळाल्याने, माळी यांनी, सत्कार व सन्मान व पुरस्कार यांच्यामुळे नेहमीच काम करण्यास प्रेरणा मिळते यावेळी जिल्हा माळी समाजाची माजी नगराध्यक्ष हनुमंत आप्पा वाडीले तसेच उद्यान पंडित माननीय विलासराव पाटील, प्रा,अण्णा माळी ह भ प विठोबा माळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष माळी खानदेश माझा चे संपादक महेंद्र भाऊ माळी सामाजिक कार्यकर्ते युवराज माळी, संतोष माळी सुमित माळी समता परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश माळी, आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला,समाजातील माजी सरपंच व धुळे जिल्हा माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी यांचे पुतणे व भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांचा, उल्लेख नीय कामगिरी केल्याबद्दल सर्व स्तरातूनस्तरातून कौतुक करण्यात येत  आहे

0/Post a Comment/Comments