जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्रभाताई परदेशी यांच्या वतीने, विविध क्षेत्रात नाविण्यपुर्ण कार्य करणाऱ्या महीला भगीणींचा सत्कार समारंभ संपन्न




धुळे : इंदिरा महिला मंडळ धुळे महाराष्ट्र सामाजिक संस्था व कोहिनूर महिला बचत गट धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने आर.आर. परदेशी प्राथमिक शाळा वलवाडी देवपूर धुळे येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.तसेच यावेळी  दैनिक पथदर्शीचे वरिष्ठ संपादक आदरणीय श्री.योगेंद्र जुनागडे यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक आपले नवराज्याचे श्री.सुनील पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी आदरणीय विमलताई बेडसे, निमडाळ्याच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई जाधव, सप्तशृंगी महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई भोसले, महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या अध्यक्षा शुभांगी ताई पाटील, धुळे महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभाताई  चौधरी विद्यमान नगरसेविका पुष्पा ताई बोरसे, माजी सरपंच आदरणीय यशोदा भटू चौधरी माजी सरपंच वलवाडी , वलवाडीच्या माजी सरपंच भटू आप्पा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या हेमांगी सनेर, विवेक फाउंडेशनच्या संचालिका मीनाक्षी जैन बीजेपी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष मायादेवी परदेशी, महादेव जी परदेशी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडत व्यापारी प्रवीण परदेशी फॅशन डिझायनिंगच्या शिक्षिका मीरा सरोज शिक्षिका माधुरी पाटील, मालती सूर्यवंशी भोकरच्या रत्नप्रभा मंगलदास पाटील आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते. यावेळी यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला प्रथमता भोकर येथील तीन व वलवाडीच्या ११ आणि एकूण १४ अंगणवाड्यांना सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच सदैव सहकार्य करणाऱ्या २० महिलांना जेवनाचे टिफिन वाटप करण्यात आले. इंदिरा महिला मंडळ व एम.सी.ई.डी. अंतर्गत 75 महिलांना एक हजार रुपये रोख त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. व विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आशा वर्कर ,आरोग्य सेविका, स्वच्छता दूत, व इतर क्षेत्रात विवीध कार्य करणाऱ्या महिलांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी दिपालीताई चौधरी शिक्षिका  ,कविता कोळी शिक्षिका एडवोकेट तरुणा पाटील चेतना मोरे कोमल ताई मगर, राणी पाटील, माधुरी पाटील, रंजना मोरे, खैरनार चंद्रकला, किरण गुरव, मंगल हरदे, हितेश पाटील, सविता रणदिवे आदींनी कार्यक्रमासाठी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेशजी गाळणकर यांनी केले 

0/Post a Comment/Comments