हजारो कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून संपामध्ये सहभागी
मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा आंदोलकांचा पवित्रा
धुळे : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आजपासून राज्यभरातील शासकीय कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे या संपाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळतंय धुळे जिल्ह्यातून देखील या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हजारो कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभाग नोंदवला आहे धुळ्यातील राज्य सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद महसूल महानगरपालिकेतील हजारो कर्मचारी या संपात सहभागी झाले असून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धुळे शहरातील कल्याण भवन ते क्युमाईन क्लब पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी विविध घोषणा देऊन शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला तसेच लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अन्यथा येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशाराही देण्यात आला दरम्यान या मोर्चामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाल्याने धुळे शहरासह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय जिल्हा परिषद तहसील कार्यालय यांसह विविध सहकारी विभागांचं कामकाज ठप्प झाल्याचे चित्र बघायला मिळालं तर या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन पुकारण्यात आल्याने शासन या आंदोलकांची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणार का याकडे राज्याचे लक्ष लागलय.
Post a Comment